Home अकोले जळत्या लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी आश्रम शाळेतील अधीक्षक निलंबित

जळत्या लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी आश्रम शाळेतील अधीक्षक निलंबित

Akole Suspended News:  शिरपुंजे आश्रम शाळेतील अधीक्षकावर निलंबनाची कारवाई.

Superintendent of Ashram School suspended for beating with burning wood

अकोले:  अकोले तालुक्यातील शिरपुंजे आश्रम शाळेतील अधीक्षक यांनी केलेल्या कृत्याची दखल घेऊन आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी अधीक्षक अश्विन कुमार अर्जुनराव पाईक यास निलंबित केले आहे. तसेच मुख्यालय सोडून जाता येणार नाही, याचबरोबर इतर दुसरे कोणतेही काम करता येणार नसल्याबाबत आदेश काढले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी शिरपुंजे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी केरकचरा गोळा केला होता. मात्र थंडीचे दिवस असल्याने या मुलांनी सदर कचरा पेटून शेकोटी घेतली. हा प्रकार अधीक्षक अश्विन कुमार पाईक याने पाहिल्यानंतर त्याने विद्यार्थ्यांना मारहाण करून जळत असलेल्या पेटत्या लाकडाच्या काड्याद्वारे विद्यार्थ्यांना मारहाण केली.

Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business

यात विद्यार्थ्यांना इजा झाली. यामुळे त्यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधीक्षकाच्या या गैरकृत्यामुळे काही सामाजिक, राजकीय संघटना, माजी आमदार वैभवराव पिचड व  आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी याविषयी आवाज उठवून कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शिरपुंजे आश्रम शाळेतील अधीक्षक अश्विन कुमार पाईक याच्यावर पोलीस कारवाईनंतर अप्पर आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे.

Web Title: Superintendent of Ashram School suspended for beating with burning wood

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here