Home क्राईम संगमनेर तालुक्यात धाडसी चोरी, ३० हजारासह ३ तोळे सोने लंपास

संगमनेर तालुक्यात धाडसी चोरी, ३० हजारासह ३ तोळे सोने लंपास

Sangamner Theft:  राहत्या घरातून चोरट्यांनी ३० हजाराच्या रोख रक्कमेसह तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पलायन.

theft in Sangamner taluka, 30000 including 3 tola gold looted

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे शुक्रवारी (२ डिसेंबर) मध्यरात्री संतोष तुकाराम मगर यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी ३० हजाराच्या रोख रक्कमेसह तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे त्याची दुचाकी घटनास्थळी टाकून देत दुसर्याची दुचाकी घेऊन पळून गेले आहेत.

याबाबत संतोष मगर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आमच्या बंगल्याचे तारीचे कंपाऊंड कटरच्या साहय्याने कट केले होते. यानंतर बंगल्याच्या किचनच्या बाजूला असलेल्या दरवाजाची कडी कटावणीच्या साहय्याने उचकटवून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बेडरुममधील कपाटाची उचकापाचक करुन ३० हजार रुपये रोख, दोन तोळे वजनाचा नेकलेस तसेच एक तोळे वजनाची चैन असा ६३ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला. यावेळी लोक येत असल्याचे पाहूण चोरट्यांनी हीरो होडा कंपनीची सीडी डिलक्स दुचाकी (एम एच १७ डब्लू ७९२३) ही जागीच त्यांनी सोडून पळ काढला. यावेळी चोरट्यांनी काही अतंरावर राहत असलेल्या विश्वनाथ रघुनाथ मगर यांची दुचाकी घेऊन पोबारा केला.

Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३६ / २०२२ नुसार भारतीय दंड संहिता कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. बी. भाग्यवान हे करत आहे.

Web Title: theft in Sangamner taluka, 30000 including 3 tola gold looted

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here