Home अकोले अकोले: सर्वोदय विद्या मंदिर ‘ खिरविरे’ येथे गणरायाला निरोप.

अकोले: सर्वोदय विद्या मंदिर ‘ खिरविरे’ येथे गणरायाला निरोप.

सर्वोदय विद्या मंदिर ‘ खिरविरे’ येथे गणरायाला निरोप.

पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी -ढोल ताशांच्या गजरात लेझीम, टिपरी नृत्य, वारकरी समाजाचे भुषण टाळ, मृदुंगावर ठेका धरणारी दिंडी आदींच्या साथीने ताल धरत त्याचप्रमाणे निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरून आलेत तुला पाहुन जाताना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ची साद घालत सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे (ता. अकोले ) येथील विद्यालयाच्या गणरायास निरोप देण्यात आला.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

सर्वोदय विदयालयाची गणेश विसर्जन मिरवणूक खिरविरे पंचक्रोशित उपस्थितांचे मने जिंकणारी आकर्षण ठरली. सालाबादाप्रमाणे याही वर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम, टिपरी नृत्य, दिंडी सोहळा,काठीची फिरकी, विविध सजवलेले सोंगे, आदी कार्यक्रम सादर केले. दरवर्षाप्रमाणे विद्यालयास गणेश मुर्ती देणार ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक पराड यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य अंतुराम सावंत, दिपक पाचपुते, शशिकांत कुलकर्णि, संपत धुमाळ, कविता वाळुंज, भरत भदाणे, नाना शिंदे, भाऊसाहेब कोते, धनंजय लहामगे, लिपिक भास्कर सदगीर,प्रा. रामदास डगळे,प्रा.विक्रम आंबरे,प्रा. सचिन लगड,प्रा. संजय देशमुख,प्रा.एकनाथ डगळे, सुधिर पराड, पि.के. बेणके, सुभाष बेणके, सुनिल देशमुख यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

फुलांनी सजवलेल्या ट्रयाक्टरमध्ये श्रींची मुर्तीची मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक मुख्य चौकात आल्यानंतर मिरवणुकीत जोश आला होता. त्यामुळे सादर केलेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. सुमारे तिन तासाहून अधिक वेळ शांततेत मिरवणुक पार पडली.

मिरवणुक संपन्नतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here