Home अकोले अकोले: धुमाळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती धुमाळ बिनविरोध

अकोले: धुमाळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती धुमाळ बिनविरोध

धुमाळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती धुमाळ बिनविरोध

अकोले  प्रतिनिधी: तालुक्यातील राजकीयदृष्ट्या समजला जाणार्‍या धुमाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेथील कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य स्वाती प्रकाश धुमाळ यांची काल ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी पि.के. देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कामगार तलाठी बाबासाहेब दातखिळे यांनी बिनविरोध निवड केले.
सरपंच पदासाठी स्वाती प्रकाश धुमाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद काही काळ रिक्त झाले होते. या जागेची काल निवडणूक होऊन स्वाती धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी माजी सरपंच सौ. चंद्रकला धुमाळ यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल झाल्यानंतर या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांच्या भूमिती या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र नेत्यांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले, त्यामुळे ही निवड ग्रामस्थ व युवकांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडली.
धुमाळवाडी ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टीने दिल्ली दरबारी आपला ठसा उमटवला होता. अकोले नवलेवाडी नंतर धुमाळवाडी ग्रामपंचायतीने विकासाची नवी पहाट निर्माण केली असून या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी वर्ग राहत असून विकासात्मक बाबींमुळे ग्रामपंचायतीकडे सरकारी कर्मचार्‍यांचा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या सरपंच पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलाराज आले आहे, विद्यमान उपसरपंच रवींद्र बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा गाडा पुढे जात आहे स्वाती धुमाळ या सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन या गावाची सूत्रे स्वीकारणार आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ बाबाजी झोळेकर किरण लोहरे, शिवा धुमाळ सौ. लतिका नाईक वाडी, सौ. ढगे, सौ. रंजनाताई धुमाळ, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला धुमाळ, सौ. संगीता चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या निवडीबद्दल अकोले नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक एडवोकेट के. डी. धुमाळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, अमृतसागर दूध संघाचे संचालक प्रवीण धुमाळ, ज्येष्ठ नेते शिवाशेठ  धुमाळ, अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटी माजी अध्यक्ष गंगाराम धुमाळ कारभारी धुमाळ, संपत धुमाळ, प्रकाश धुमाळ, ज्येष्ठ नेते वसंतराव धुमाळ कोंडीराम चौधरी, सुरेश अप्पा धुमाळ, दामोदर झोळेकर, संजय झोळेकर, अण्णा शेटे, उत्तम धुमाळ, दत्ता धुमाळ, पोलीस पाटील प्रणाली धुमाळ, इंजिनिअर भरत धुमाळ यासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी सौ. स्वाती धुमाळ यांनी बोलताना सांगितले की सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली. त्या जबाबदारीचे भान ठेवून ठेवलेल्या विश्‍वासाला तडा न जाऊ देता सर्वांना विश्‍वासात घेऊन मी धुमाळवाडी ग्रामपंचायतीचे नाव विकासाच्या नकाशावर कायम ठेवेल. माझ्या निवडीचा अभिमान नसून मिळालेल्या संधीचे सोने करणे हे माझे उद्दिष्ट असून यासाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांना युवकांना महिलांना विश्‍वासात घेऊन मी या ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या प्रकारे करेन असा आत्मविश्‍वास धुमाळ यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

Website Title: Swati Dhumal unanimously elected as Sarpanch of Dhumalwadi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here