Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘शिवसेना’ नावासह धनुष्यबाण चिन्ह गोठवले- Shiv sena

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘शिवसेना’ नावासह धनुष्यबाण चिन्ह गोठवले- Shiv sena

Shiv Sena‘s ‘Bow & Arrow’ symbol claim Election Commission of India passes interim order, says in Andheri East bye polls neither of the two groups shall be permitted to use the symbol “Bow & Arrow”, reserved for “Shivsena”.

Symbol of Shiv Sena Bow and Arrow has been fridged for election

नवी दिल्ली: शिवसेनेच्या (Shiv sena) उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. 

मात्र पोटनिवडणुकीपर्यंतच चिन्ह गोठवण्यात आलं आहे. शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते. तर ठाकरे गटाला धक्का आहे. कारण अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवर असून शिंदे गटाचा उमेदावर नाही. याचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार आहे.

@ANI•  Election Commiss

Shiv Sena’s ‘Bow & Arrow’ symbol claim Election Commission of India passes interim order, says in Andheri East bye polls neither of the two groups shall be permitted to use the symbol “Bow & Arrow”, reserved for “Shivsena”.

ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्क सादर केला होता. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगा धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय शिवसेना नाव दोन्हीही गटाला वापरता येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Sharad Pawar: भागवतांच्या ‘ब्राह्मणांनी प्रायश्चित करावं’ या विधानावर पवार म्हणाले. दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं असून ते रद्द केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. मात्र या जर तरच्या बाबी आहे.

अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष-बाणावर दावा सांगितला होता. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत निवडणूक चिन्हाचा हा वाद लवकर निकाली काढणे आवश्यक आहे. कारण उद्धव ठाकरे गट आपल्या उमेदवारांसाठी धनुष्य-बाण चिन्हावर दावा करू शकते, असंही पत्रात नमूद केलं होतं.

Web Title: Symbol of Shiv Sena Bow and Arrow has been fridged for election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here