Home Accident News Accident: पिकअप दुचाकी अपघातात संगमनेरातील दोघांसह तिघे ठार

Accident: पिकअप दुचाकी अपघातात संगमनेरातील दोघांसह तिघे ठार

Takali dhokeshvar Pickup Motorcycle Accident

पारनेर | Accident: नगर कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर शिवारात पीकअप दुचाकी अपघात गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर पिक अप चालक पसार झाला. हा अपघात इतका भयानक होता की, तीनही व्यक्तींचे अवयव चिन्ना विचन्ना अवस्थेत रस्त्यावर पडले होते.

लहू विश्वनाथ बर्डे वय ४० रा.खडकवाडी, विकास बर्डे, रा. साकुर संगमनेर, गणेश प्रकाश बर्डे रा. अकलापूर संगमनेर अशी अपघातातील मयतांची नवे आहेत.

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

नगर कल्याण महामार्गावरील टोल नाका ओलांडून नगरहून टाकळी ढोकेश्वरकडे एक पिक अप वाहन चालले होते. त्याचवेळी एका दुचाकीहून तिघे जण नगरकडे चालले होते. यावेळी गुरुवारी सायंकाळी सायंकाळच्या सुमारास टाकळी ढोकेश्वर शिवारात भरधाव पिक अपने दुचाकीस धडक दिली.पिकअपने दुचाकीसह त्यावरील तिघांना फर फकटट नेले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिक अप चालक पसार झाला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.   

Web Title: Takali dhokeshvar Pickup Motorcycle Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here