Home क्राईम आंघोळ करीत असलेल्या महिलेची स्नानगृहाच्या खिडकीतून अश्लील चित्रफित काढताना अचानक….

आंघोळ करीत असलेल्या महिलेची स्नानगृहाच्या खिडकीतून अश्लील चित्रफित काढताना अचानक….

Nagpur Crime:  मोबाईल तपासला असता त्यात पत्नीचे अश्लील छायाचित्र (pornographic video ) आणि दोन चित्रफिती आढळून आल्या.

Take a pornographic video of a woman taking a shower from the bathroom

नागपूर: आंघोळ करीत असलेल्या महिलेची स्नानगृहाच्या खिडकीतून एका युवकाने भ्रमणध्वनीने चित्रफीत काढत असताना यादरम्यान, महिलेचा पती घरी आला. त्याने युवकाला चोप देत पोलिसांत तक्रार दिली. गोलू ऊर्फ कमलेश हजारे (२३, मौदा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात २३ वर्षीय विवाहित महिलेशी गोलूची ओळख होती. तो शेजारी राहत असल्यामुळे तो घरी येत होता. तो महिलेवर एकतर्फी प्रेम करीत होता.

१ एप्रिलला दुपारी बारा वाजता महिला आंघोळीला गेली होती. ती आंघोळ करीत असताना गोलू लपून बाथरुमजवळ आला. त्याने बाथरुमच्या खिडकीतून भ्रमणध्वनीने छायाचित्र आणि चित्रफित काढली. महिला अनभिज्ञ असल्यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही. दुसऱ्या दिवशी गोलू महिलेचे आंघोळ करताना छायाचित्र आणि चित्रफित काढत होता. यादरम्यान, महिलेचा पती घरी आला. त्याला बाथरुमच्या मागे गोलू दिसला. त्याने पळत जाऊन गोलूला पकडले. त्याचा मोबाईल तपासला असता त्यात पत्नीचे अश्लील छायाचित्र आणि दोन चित्रफिती आढळून आल्या. त्या बघून पतीचा पारा चढला. त्याने गोलूची चांगली धुलाई केली. तो पत्नीला घेऊन मौदा पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी तक्रारीवरून गोलूविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Take a pornographic video of a woman taking a shower from the bathroom

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here