Home क्राईम प्रेमीयुगुलाला दरोडेखोराने अडवलं, मैत्रिणीला छेडताना थांबवताच धाड.. धाड.. गोळीबार

प्रेमीयुगुलाला दरोडेखोराने अडवलं, मैत्रिणीला छेडताना थांबवताच धाड.. धाड.. गोळीबार

Nanded Crime: रस्त्यावरून जात असलेल्या प्रेमीयुगुलाला अडवून एका दरोडेखोराने गोळीबार (Firing) केला. यात प्रियकराला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाल्याची घटना.

robber intercepted the couple and opened firing

नांदेड : शहरात गुन्हेगारीत वाढ होत आहे. गोळीबार, लुटमार, छेडछाड, दरोडा, चेन स्नॅचिंग यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. सोमवारी रात्री नांदेड शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं. रस्त्यावरून जात असलेल्या प्रेमीयुगुलाला अडवून एका दरोडेखोराने गोळीबार केला. यात प्रियकराला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शुभम दत्तात्रय पवार हा सोमवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीने आपल्या मैत्रिणी सोबत विष्णुपुरी परिसरातील पांगरा मार्गावरील फायबर बटकडे जात होता. फायबर बटजवळ येताच अंधारात लपून बसलेला एक दरोडेखोर तिथे आला. त्यानंतर आरोपीने बंदूकीचा धाक दाखवून प्रियकराच्या जवळील चेन आणि पैसे बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर तो नराधम शुभमच्या मैत्रिणी सोबत अभद्र व्यवहार करत होता. तेव्हा शुभम पवार याने विरोध केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटी दरम्यान दरोडेखोराने शुभम पवार याच्यावर गोळी झाडली. ती गोळी शुभमच्या बरगडीत लागली आणि तो जखमी झाला आहे.

या गोळीबारात जखमी होऊन रक्तबंबाळ झालेल्या शुभमला नागरिकांनी विष्णुपुऱी येथील शासकीय रुग्णालात दाखल केलं. दरम्यान गोळीबाराची घटना घडल्यानंतर ग्रामीण पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी पसार झाला. या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

Web Title: robber intercepted the couple and opened firing

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here