Home क्राईम धक्कादायक! एका महिलेच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

धक्कादायक! एका महिलेच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

Nanded Crime: नांदेडच्‍या जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षकाने गळफास घेऊन  आत्महत्या (Suicide) केल्‍याची घटना, महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप शिक्षकाच्‍या पत्नीने केला.

teacher commits suicide after suffering from a woman

नांदेड : नांदेडच्‍या जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना समोर आली आहे. महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप शिक्षकाच्‍या पत्नीने केला आहे.

नांदेड़ जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मथुरा तांडा जिल्हा परिषद शाळेवर  कार्यरत गौतम भिवगडे हे सारखानी येथे राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सिंदखेड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मयत शिक्षकाच्या पत्नीचा जवाब नोंदविला.

मथुरा तांडा जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने सारखानी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एका महिलेच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा आरोप मयत शिक्षकाच्या पत्नीने केला आहे. सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किनगे हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: teacher commits suicide after suffering from a woman

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here