Home Accident News बायपास सुरू होताच अपघात; ट्रॅक्टर-जीपच्या धडकेत ६ ठार

बायपास सुरू होताच अपघात; ट्रॅक्टर-जीपच्या धडकेत ६ ठार

Accident: विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर व जीपच्या धडकेत जीपमधील सहा जण ठार, तर दोन मुली जखमी.

Accident as the bypass begins 6 killed in tractor-jeep collision

मिरज |सांगली: मिरजमधून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर नवीन महामार्गाच्या बायपासवर वड्डी (ता. मिरज) येथे बुधवारी विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर व जीपच्या धडकेत जीपमधील सहा जण ठार, तर दोन मुली जखमी झाल्या. देवदर्शनास पंढरपूरला जात असताना ही दुर्घटना घडली. मृतांत सरवडे (कोल्हापूर) येथील पोवार कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. हा बायपास मंगळवारीच सुरू करण्यात आला होता.

जयवंत पोवार (वय ५४), पत्नी स्नेहल (४५), मुलगा सोहम (१२), कोमल शिंदे (६३), लक्ष्मण शिंदे (७०, मूळगाव बानगे, सध्या सुरत, गुजरात), जीपचालक उमेश उदय शर्मा (३०) यांचा मृत्यू झाला. जयवंत पोवार यांच्या मुली श्रावणी व साक्षी जखमी झाल्या.

ट्रॅक्टर आणि जीपच्या धडकेत या दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिशादर्शक फलकही नाहीत.. रेल्वे पुलानजीक रखडलेले काम पूर्ण झाल्याने मंगळवारी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रस्ता सुरु झाला. मात्र, येथे कोणतेही माहिती फलक अथवा दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. यामुळे अनेक जण बिनबोभाटपणे एकेरी मार्गिकेत वाहने दामटत आहेत. यामुळे रस्ता सुरु झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी भीषण अपघात होऊन सहा बळी गेले.

Web Title: Accident as the bypass begins 6 killed in tractor-jeep collision

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here