Home Accident News कार दरीत कोसळून अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी

कार दरीत कोसळून अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी

Beed Accident: कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात शिक्षक पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाल्याची घटना.

Teacher dies on the spot, wife injured Accident in car crash in valley

बीड:  नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना अज्ञात वाहनाने हूल दिल्याने कार चालकाचा ताबा सुटल्याने  कार थेट दरीत कोसळून झालेल्या अपघातात शिक्षक पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाली आहे. ही घटना बीड सांगवी येथील महादेव दरा येथील घाटात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

अंबादास पांडुरंग उगले असे मयत शिक्षकाचे नाव आहे. श्रीगोंदा तालुक्यातील थेटे सांगवी येथील उगले हे गेवराई येथील एका शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करतात. तर त्यांची पत्नी आणि मुले लातूर येथे असतात. कडा येथील एका नातेवाईकांचा अंत्यविधी असल्याने उगले हे कार क्र. (एम.एच २३/ए.डी.०२४९) ने आज सकाळी गेवराईवरून निघाले. तर पत्नी लातूरवरून सावरगाव घाटपर्यंत सहकाऱ्यांच्या गाडीत आली होती.

शिक्षक उगले यांनी पत्नीला सावरगाव घाट येथून सोबत घेत कारमधून निघाले. दरम्यान, बीड सांगवी येथील महादेव दरा घाटात अज्ञात वाहनाने हुल दिल्याने ताबा सुटून कार खोल दरीत कोसळली. यात अंबादास पांडुरंग उगले यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सगुना या जखमी झाल्या.हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले, की या शिक्षकाच्या गाडीला हूल देणारी गाडी भरधाव वेगाने जात होती. तिने अचानक अंगावर येऊन हूल दिल्याने हा अपघात झाला.

Web Title: Teacher dies on the spot, wife injured Accident in car crash in valley

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here