Home क्राईम धक्कादायक! विस्तार अधिकाऱ्याकडून शिक्षिकेवर बलात्कार

धक्कादायक! विस्तार अधिकाऱ्याकडून शिक्षिकेवर बलात्कार

Breaking News | Pune Crime: गोपनीय शेरे खराब करून अडचणीत आणून नोकरी गमावण्यास भाग पाडेन, असा दबाव आणत विस्तार अधिकाऱ्यानेच बलात्कार (raped) केल्याची घटना.

Teacher raped by extension officer

पुणे : पुणे ग्रामीण भागातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ग्रामीण भागातील एका शिक्षिकेवर गोपनीय शेरे खराब करून अडचणीत आणून नोकरी गमावण्यास भाग पाडेन, असा दबाव आणत विस्तार अधिकाऱ्यानेच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी आत्महत्या करण्याची धमकी देखील या विस्तार अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात सचिन हरिभाऊ लोखंडे (वय 47, रा. वारजे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 35 वर्षीय शिक्षिकेने तक्रार दिली आहे. हा प्रकार गेल्या सात वर्षांपासून सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार पीडिता शाळेत शिक्षिका आहेत. तर जिल्हा परिषदेत सचिन लोखंडे हा विस्तार अधिकारी आहे. दरम्यान, सचिन व पीडितेची 2016 पासून ओळख आहे. या ओळखीनंतर अधिकारी पदाचा गैरवापर करून त्यांना नोकरी घालवण्याची तसेच गोपनीय शेरे खराब करून अडचणीत आणेल, असा दबाव टाकत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. प्रकरणी सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Teacher raped by extension officer

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here