Home जालना तुम्ही बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू- मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

तुम्ही बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू- मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

Maratha Reservation:  फक्त आमचे बॅनर फाडले, आम्ही त्यांचे कपडे फाडू शकतो.

tear the banner, we will tear the clothes - Manoj Jarange-Patil's warning

जालना: भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे जे घडले ते चुकीच आहे. तेथील मंत्री आणि आमदारांची मस्ती आहे. त्यांनी तर फक्त आमचे बॅनर फाडले, आम्ही त्यांचे कपडे फाडू शकतो. मी मराठा समाजाला शांत ठेवलंय, हुं जरी म्हटलं तर तुमची पूर्ण जिरतील, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

जरांगे पाटील यांना रविवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे आले. सोमवारी सकाळी ते म्हणाले की सामान्य मराठ्यांनी मनावर घेतले तर त्यांना आयुष्यभर गुलाल लागणार नाही. विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या हातात कायदा नाही. कोणतीही शक्ती मराठयांना आरक्षणापासून रोखू शकत नाही.

ज्या नोंदी सापडल्या त्यावरून मराठा कुणबी एकच आहे. असा अहवाल तयार केला जात आहे. याबाबत कायदा मंजूर करून राज्यभरात सरसकट कुणी प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

-मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलनाचे नेते

ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे थांबवावे!

ओबीसींच्या संवैधानिक अधिकाराचे संरक्षण करण्याचा अधिकार ओबीसी नेत्यांनाही आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील हे वारंवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करून मराठा व ओबीसीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करत ओडीसी नेत्यांना टार्गेट करणे थांबवावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी केले. आम्ही आमचे काम करतो, तुम्ही तुमचे काम करा, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Maratha Reservation tear the banner, we will tear the clothes – Manoj Jarange-Patil’s warning

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here