Home Accident News टेम्पोने बांधकाम कामगारांना चिरडले, अपघातात दोघे ठार -Accident

टेम्पोने बांधकाम कामगारांना चिरडले, अपघातात दोघे ठार -Accident

Beed Accident News:  दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या बांधकाम कामगारांना टेम्पोने चिरडल्याची घटना, दोघे ठार.

Tempo crushes construction workers, two killed in accident

बीड: भरधाव वेगात असलेल्‍या टेम्पोने दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या बांधकाम कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात बांधकाम मिस्त्रीसह एक कामगार महिलेचा जागीच मृत्‍यू झाला आहे. बीड- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात दुपारी तीनच्‍या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातात अनिता भारत सरपते (वय 41, रा. गोविंदनगर, बीड) व कालिदास विठ्ठल जाधव (वय 38, रा. शेलगाव गांजी ता. केज) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. अनिता सरपते या बिगारी काम करत होत्‍या, तर कालिदास जाधव हे बांधकाम मिस्त्री होते. ते दोघे बांधकामावर कामासाठी दुचाकीवरून मांजरसुंबाकडे जात होते. यादरम्यान गेवराईकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोने त्यांना चिरडले.

दरम्यान, अनिता सरपते यांचा मृतदेह टेम्पोखाली अडकला होता. अखेर क्रेनच्‍या सहाय्याने तो बाहेर काढला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. दरम्यान अपघातानंतर अनिता सरपते यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Tempo crushes construction workers, two killed in accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here