Home क्राईम धक्कादायक! पहाटे भर साखरझोपेत पत्नी व मुलाची कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून हत्या

धक्कादायक! पहाटे भर साखरझोपेत पत्नी व मुलाची कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून हत्या

Murder Case:  पत्नी व  मुलगा या दोघांच्या गळ्यावर कु-हाडीने वार करून हत्या, कृत्याची कबुली.

wife and son were murder by stabbing their necks with an axe

बीड: जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे एका तरुणाने आपली पत्नी व पाच वर्षांच्या मुलाची साखर झोपेत असताना कुन्हाडीने हत्या (Murder) केली. मंगळवारी दि.11 रोजी पहाटे ही घटना घडली. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. पांडुरंग शिवाजी दोडतले (वय 25 वर्ष) असे नराधमाचे नाव आहे, त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे काळे वस्ती असून तेथे शिवाजी दोडतले हे शेतकरी राहतात. त्यांच्यासोब त्यांचा मुलगा पांडुरंग व त्याची पत्नी लक्ष्मी व त्यांची तीन मुले राहायची. लक्ष्मी मागील दोन महिन्यांपासून कौटुंबिक वादामुळे माहेरी लहामेवाडी येथे वडील शिरू गणपती शेंडगे यांच्याकडे राहत होती. वडील रविवारी कर्नाटक येथे ऊसतोडणीसाठी गेले व त्यांनी लक्ष्मीला सोमवारी दुपारी नवऱ्याकडे आणून सोडले होते.

त्यानंतर अवघे काही तास उलटताच मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास लक्ष्मी व तिची मुले साखर झोपेत असताना पांडुरंग याने लक्ष्मी व मोठा पाच वर्षांचा मुलगा या दोघांच्या गळ्यावर कु-हाडीने वार केले त्यात दोघेही जागीच ठार झाले. या घटनेनंतर आरोपीने ग्रामीण पोलीस ठाण्यात आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश खटकळ, उपनिरीक्षक विजयसिंह जोनवाल हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. या हत्येमागे कौटुंबिक वाद असू शकतो असा पोलिसांचा कयास आहे.

Web Title: wife and son were murder by stabbing their necks with an axe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here