Home संगमनेर Accident | संगमनेर: टेम्पोची दुचाकीला धडक दिल्याने अपघात , एक जागीच ठार

Accident | संगमनेर: टेम्पोची दुचाकीला धडक दिल्याने अपघात , एक जागीच ठार

Tempo hit the bike, killing one on the spot Accident 

Sangamner | संगमनेर: संगमनेर – कोल्हार राज्य महामार्गावरील कोंची शिवारात राजहंस दूध संघाच्या टेम्पो चालकाचा टेम्पो वरील ताबा सुटल्याने दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात (Accident) झाल्याची घटना शनिवार (दि. २१) दुपारी घडली. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली.

अजीज बाबुलाल सय्यद ( वय ४२ वर्षे रा. प्रवरानगर ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजीज बाबुलाल सय्यद हे आपल्या डिस्कव्हर दुचाकीवरून ( क्र. एमएच १७ एवाय ३४५० ) लोणीहुन संगमनेरकडे जात असताना कोंची शिवारात पिंपळाच्या ओढ्याजवळ संगमनेरहुन निमगावजाळीकडे भरधाव वेगात जात असलेल्या राजहंस दुध संघाच्या टेम्पो( क्र. एमएच १७ एजी ६८२० ) चालकाचा टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अजीज सय्यद हे जागीच ठार झाले. दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेस संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव समजु शकले नाही. अपघाताच्या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

Web Title: Tempo hit the bike, killing one on the spot Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here