Home जळगाव Rape | संतापजनक: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

Rape | संतापजनक: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

Rape Torture and abduction of a minor girl

चाळीसगाव | Jalgaon: चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे.  मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. तब्बल साडे सहा महिने शारीरिक संबंध (Sexual relation) प्रस्थापित केले. यामधून ती मुलगी गर्भवती झाल्याचा प्रकार  २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आला.. भगवान (रा. चांभार्डी बु. ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.

Web Title: Rape Torture and abduction of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here