बाता मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हिम्मत असेल तर इंधनाचे दर कमी करून दाखवावे
मुंबई | Petrol Rate: इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रसरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. तसेच उज्जवला योजनेतील लाभार्थ्यांना घरगुती सिलेंडरवर प्रति सिलेंडर २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. याच दरम्यान ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार इंधनावरील कर कमी करून जनतेला दिलासा देणार का? असा सवाल केला आहे.
भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या टविटर अकाऊन्ट वरून याबबत एक ट्वीट केलं आहे. “बाकी मोठमोठ्या बाता मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत असेल तर आपल्या अखत्यारीत पेट्रोल डिझेलवरील किमान काही रुपये तरी कमी करून दाखवावे. इधर-उधरच्या थापा न मारता जनतेला दिलासा द्यावा”.
भाजप टविटर अकाऊन्ट वरून याबबत एक ट्वीट केलं आहे “पेट्रोल, डिझेल, घरघुती गॅस केंद्र सरकारने स्वस्त केल्यानंतर आता प्रश्न असा आहे की, दरवेळी पेट्रोल, डिझेल दरवाढीचा बागुलबुवा करणारे, सायकल मोर्चा काढणारे ढोंगी राजकारणी व महाराष्ट्राचे वसुली सरकार आपला वाटा व नफेखोरी देखील कमी करतील का?”
Web Title: Petrol Rate Question Keshav upaddhey