Home औरंगाबाद Rape | धक्कादायक! बहिणीकडे आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर दोन तरुणांकडून बलात्कार

Rape | धक्कादायक! बहिणीकडे आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर दोन तरुणांकडून बलात्कार

45-year-old woman who came to her sister was rape by two young men

Aurangabad | फुलंब्री: तालुक्यातील वाहेगावात बहिणीकडे आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून वडोद बाजार पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

तालुक्यातील नायगावच्या ४५ वर्षीय महिला १७ मे रोजी वाहेगावात ते निधोना रस्त्यावर जात असताना दोन तरुण दुचाकीवर आले. व त्यांनी बळजबरीने सदर महिलेस दुचाकीवर बसवून परिसरातील शेतात नेऊन बलात्कार केल्याची तक्रार पिडीत महिलेने वडोदाबाजार पोलिसांत दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रामेश्वर जाधव, मोहसीन शेख रा. वाहेगाव अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी निधोना परिसरातील एका ढाब्यावर वेटर म्हणून कामास आहे. त्यांचे साधारणतः २० ते २२ वयोगटातील आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक कुंभारे हे करीत आहे.

Web Title: 45-year-old woman who came to her sister was rape by two young men

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here