Home क्राईम Rape | भयंकर! धावत्या रेल्वेत १४ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्कार, हैवानी कृत्य 

Rape | भयंकर! धावत्या रेल्वेत १४ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्कार, हैवानी कृत्य 

Rape Case : पिडीत मुलगी विना तिकीट प्रवास करीत असताना तिच्यावर बलात्कार.

Terrible A 14-year-old orphan girl was rape in a running train

पुणे: धावत्या झेलम एक्स्प्रेसमध्ये १४ वर्षाच्या एका अनाथ मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना झेलम एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असलेल्या पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांनी केली. याप्रकरणी तिघांना पोलिसांना अटक केली आहे.

पॅन्ट्री कारमधील एका कर्मचाऱ्याने या अनाथ मुलीवर बलात्कार केला तर इतर दोघांनी त्याला साथ दिली. १९ जुलै रोजी रात्री साडे बारा वाजता हे कृत्य केले. भुसावळ रेल्वे पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे.

भोपाळहून झेलम एक्स्प्रेस ट्रेन पुण्याच्या दिशेने जात असताना 14 वर्षीय मुलीसोबत गाडीच्या पॅन्ट्रीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने हे हैवानी कृत्य केलं आहे. ही बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा पीडितेला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं होत, पीडितेची जेव्हा सामाजिक संस्थेने चौकशी केली, त्यानंतर या कृत्याबाबत पीडितेन खुलासा केला, त्यानंतर एनजीओच्या मदतीने पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

भुसावळ रेल्वे स्थानकात एक अल्पवयीन अनाथ मुलगी आढळून आली होती. या मुलीसोबत सामाजिक संस्थेच्या काही लोकांनी संवाद साधला त्यानंतर पीडितेन सांगितलेला घटनाक्रम ऐकून सगळेच हादरून गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी विनातिकीट झेलम एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होती. ती एका एसी कम्पार्टमेन्टमध्ये असताना तिची पॅन्ट्रीत काम करणान्या एका कर्मचान्याने चौकशी केली.

तुला टीसीकडे देईन, अशी भीती दाखवून कर्मचारी तिला पेंन्ट्री कारमध्ये घेऊन गेला. तिथे नेत त्यानं तिला जेवण देतो, असं म्हणत भूलही लावली. यानंतर त्यानंतर तिच्यावर पेन्ट्रीत बलात्कार (Rape) केला. त्यादरम्यान, तिथे इतर दोन कर्मचारीही होते पण त्यांनी त्याला रोखण्याचाही प्रयत्न केला नाही यावेळी पीडित मुलगी विव्हळत होती. तडफडत होती. पण कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही त्यानंतर तिला भुसावळ रेल्वे स्थानकात उतरवण्यात आलं. रेल्वेतील या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Terrible A 14-year-old orphan girl was rape in a running train

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here