महिला बाथरूममध्ये अंघोळीला गेली असता घडले धक्कादायक कृत्य
Ahmednagar theft News: नात्यातील महिलेनेच चोरले दागिने, तिच्या राहत्या घरातून अटक.
अहमदनगर: महिला बाथरूममध्ये अंघोळीला गेली असताना घरात घुसून तिच्या नात्यातील महिलेनेच कपाटातील ८० हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरून (theft) नेल्याची घटना घडली आहे. नगर दौंड रोडवरील हनुमाननगर येथे शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दागिणे चोरणार्या महिलेला अटक केली आहे. माया मार्कस तिजोरे (वय 35 रा. इंदीरानगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून 80 हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहे.
लिलाबाई विश्वनाथ वाघमारे (रा. हनुमाननगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी वाघमारे यांची मावस नातसून माया तिजोरे ही वाघमारे यांच्या घरात आली व तिने 80 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, तान्हाजी पवार, संदीप थोरात, अभय कदम, अतुल काजळे, कल्पना आरवडे, सतीष भांड, प्रशांत बोरूडे यांच्या पथकाने माया तिजोरे हिला राहत्या घरातून अटक केली आहे.
Web Title: woman in the relationship who theft the jewellery