ड्युटीवर गेली ती परतलीच नाही, तीन दिवस झाले तरी महिला पोलीस बेपत्ताच
Kalyan Crime: ड्युटीवर गेलेली महिला पोलीस तीन दिवसापासून बेपत्ता (Missing) असल्याची घटना समोर.
कल्याण: ड्युटीवर गेलेली महिला पोलीस तीन दिवसापासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे. बाजारपेठ पोलिसांकडून तीन पथक तयार करत महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. श्वेता सरगिरे असे 24 वर्षीय बेपत्ता महिलेचे नाव आहे. सदर महिला पोलीस नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होती. महिलेची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस सखोल तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण पश्चिमेला राहणारी श्वेता सरगिरे ही महिला नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे महिला आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघून गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. कुटुंबीयांनी संपर्क केला मात्र संपर्क होत नाही म्हणून अखेर कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत मिसिंगची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करत शोध सुरु केला. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. मात्र तीन दिवस उलटले तरी अद्याप महिलेचा थांगपत्ता लागला नाही.
Web Title: the female police officer is still missing
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App