अकोले: रंधा धबधब्याजवळ प्रवरा नदीपात्रात युवक वाहून गेला अन घडले असे काही…
Akole News: रंधा धबधब्याजवळ प्रवरा नदीपात्रात युवकाचा पाय घसरून पडून वाहून गेल्याची घटना. (riverbed)
अकोले: रंधा धबधब्याजवळ प्रवरा नदीपात्रात युवकाचा पाय घसरून पडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो बचाविला आहे. लेकराला वाचवण्यासाठी टोहो फोडणाऱ्या आई आणि मुलासाठी पोलीस देवदूत ठरले आहेत. संचितला बाहेर काढल्यावर संचितची आई सिमा व संचित यांनी देवदुतांचे ऋण व्यक्त केले आहे.
शासकीय सुड्या असल्याने १५ ऑगस्ट रोजी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तीन दिवस सुट्टी असल्याने भंडारदरा, रंधा परिसरात आई सीमा सोनटक्के सोबत आपला १२ वी त शिकणारा संचित केदारनाथ सोनटक्के (वय १७, रा.नाशिक रोड) हा फिरावयास आला होता. तर रंधा धबधबा परिसरात पर्यटक आनंद लुट असताना संचितलाही आपला आनंद लुटण्याचा मोह आवरता आला नाही.
तो घोरपडा मातेच्या मंदिरासमोरील प्रवरा नदीपात्रात आईसह काही मैत्रिणी फोटो घेत होता. परंतु संचित पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात संचिता पाय घसरल्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने आईने मदतीसाठी टाहो फोडला नशीब बलवत्तर संचितचा पाय अचानक रंधा पाण्यातील दगडाला अडकला. मध्यभागी असलेल्या दगडावर संचित पाण्यातून वाट काढत स्थिरावला. तो खडकावर जाऊन बसला यानंतर होमगार्ड रामदास पटेकर, दत्तू जाधव यांनी राजुर पोलीस स्टेशनची संपर्क साधून माहिती दिली.
तात्काळ राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे हे घटनास्थळी दाखल झाले. फॉलवर प्रवरा नदीत दगडाचा आधार घेत अडकलेला संचित सोनटक्के याला रिस्की ऑपरेशन करून एक झाडाला बांधून दुसरा दोराचे टोक संचितकर्ड फेकले संचितने आपल्या कमरेला दोर बांधून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पो. कॉ. अशोक गाठे दत्तू जाधव, विजय देठे, रोहिदास वडे, वसंत भोईर यांनी अलगत संचित ला दोराच्या सहायाने बाहेर ओढून काढले. दैव बलवत्तर म्हणून संचित वाचला आहे.
Web Title: a young man has swept away in the Pravara riverbed near Randha waterfall
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App