Home अमरावती पैशाचा पाऊस पडला नाही म्हणून मांत्रिकाला केले ठार

पैशाचा पाऊस पडला नाही म्हणून मांत्रिकाला केले ठार

Amravati Crime:  एका मांत्रिकावर नागपूरच्या चौघांनी फावड्याने हल्ला चढविला. त्यात मांत्रिकाचा मृत्यू. चार आरोपींनी खुनाची कबुली.

Mantrika was Murder because money did not rain

 

अमरावती:  पूजा बांधून पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करणाऱ्या एका मांत्रिकावर नागपूरच्या चौघांनी फावड्याने हल्ला चढविला. त्यात मांत्रिकाचा मृत्यू झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री शिवणी शिवारातील एका झोपडीत हा प्रकार घडला. रमेश मेश्राम (वय ६३, रा. मिलिंदनगर, चांदूर रेल्वे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी, मृताचा मुलगा उज्ज्वल याच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी १५ ऑगस्टला रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी नागपूरमधील कमलाकर बाबूराव मेश्राम (४५), अक्रम याकुब शहा (२३), कमलाकर साहेबराव चरपे (४४), राजेश अभिमन्यू येसनपुरे ( २८ ) व गाडीचालक मयूर प्रमोद मडगिलवार(२६) यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. चार आरोपींनी खुनाची कबुली दिली. रमेश मेश्रामशी वादावादी झाल्यानंतर आपण त्याला फावड्याने मारल्याचे आरोपींनी सांगितले.

आरोपी १४ ऑगस्टला मेश्रामच्या शेतातील झोपडीत पोहोचले. मांत्रिकाने पूजा मांडून दारू प्राशन केली. नशेत आरोपींना शिवीगाळ केली. चारही आरोपींनी त्याच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने व काठीने प्रहार केले. मेश्राम याने आरोपींकडून पैशाचा पाऊस पाडण्याकरिता सौदा करून मोठी रक्कम उकळली होती.

Web Title: Mantrika was Murder because money did not rain

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here