Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाने केला विवाहितेवर अत्याचार , घर दाखवितो म्हणून…

अहमदनगर: तरुणाने केला विवाहितेवर अत्याचार , घर दाखवितो म्हणून…

Ahmednagar Crime News:  नगर शहरात एका विवाहितेवर तरुणाने अत्याचार (abused) केल्याची घटना.

Young man abused a married woman

अहमदनगर:  नगर शहरात एका विवाहितेवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  प्रकरणी पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम संजय वाणी (रा. मोहटादेवी मंदिराजवळ, कल्याण रस्ता) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रविवारी रात्री घरासमोर पतीची वाट पाहत उभ्या असताना वाणी तेथे आला. त्याने फिर्यादीकडे त्यांच्या पतीविषयी चौकशी केली व चल मी तुला माझे घर दाखवितो, असे म्हणून त्याच्या दुचाकीवरून घरी नेले. फिर्यादीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून बळजबरीने अत्याचार केला असल्याचे पीडितीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पीडितेने वाणी याच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले.

घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी विक्रम वाणी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पुढील  तपास करीत आहेत.

Web Title: Young man abused a married woman

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here