अहमदनगर हादरले! अगोदर हत्याकांड अन नंतर गळफास घेऊन आत्महत्या
Ahmednagar News: कौटुंबिक वादातून हे हत्याकांड, मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ.
राहुरी: पतीने पत्नी अन् सासूचा खून केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कात्रड येथे घडली. घटनेमधील संशयित आरोपी सागर सुरेश साबळे हा दुहेरी हत्येनंतर पसार झाला. पोलिस पथके त्याचा शोध घेत असतानाच नगर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयित सागर साबळे याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड झाल्याची तालुक्यात चर्चा आहे.
कावड येथे नूतन सागर साबळे (वय (२३) व तिची आई सुरेखा दिलीप दांगट (वय ४५) या दोघींचा मंगळवारी (दि. १५) रात्री ११ च्या दरम्यान झोपेत असताना आरोपी सागर सुरेश साबळे याने खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाला. जाताना त्याने त्याची छोटी मुलगी शेजारी भावाकडे नेऊन ठेवली होती. अचानक छोट्या मुलीला घरी आणून का सोडले, हा प्रश्न त्याच्या भावाला व आईला पडला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास सागरचा भाऊ मुलीला तिच्या आईकडे सोपविण्यासाठी म्हणून आला. तेव्हा त्याला या दोघी मायलेकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्याने आरडाओरडा केला. राहुरी पोलिसांना फोनवरून माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
Web Title: First the murder and then the suicide by hanging
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App