अहमदनगर: पोलिसांनी वेषांतर करून पाच दरोडेखोर पकडले
Ahmednagar | parner news: दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पकडले (Arrested). त्यांच्याकडून दोन लाखांचे साहित्य जप्त.
पारनेर: पारनेर शेतकरी व मेंढपालांचा पेहराव घालून पोलिसांनी तालुक्यातील नगर कल्याण रस्त्यावरील धोत्रे शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून दोन लाखांचे साहित्य जप्त केले. सदर कारवाई सोमवारी करण्यात आली.
धोत्रे शिवारात नगर-कल्याण महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना अडवून लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी पोलिसांची चार पथके तयार केली. त्यात वेषांतर करून शेतकरी व मेंढपाळांचा पेहराव परिधान करण्यास सांगून दरोडेखोर थांबलेल्या ठिकाणी पाठविले. वेशांतर केलेले दरोडेखोर बसलेल्या तलावालगतच्या झाडांमध्ये जाऊन लपले. त्यांनी अचानक दरोडेखोरांवर छापा टाकला. पोलिस आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. तेव्हा पोलिसांनी संजय हात्यान भोसले, (रा. वाघुंडे, ता. पार नेर), अक्षय उंबऱ्या काळे (सुरेगाव, ता. श्रीगोंदा), एक अल्पवयीन बालक, तसेच सुंगरीबाई गणेश भोसले (सुरेगाव श्रीगोंदा) व मनीषा संजय भोसले. (रा. वाघुंडे, ता. पारनेर) अशा पाच दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे व चार मोटारसायकली असा १ लाख ८६ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत पोलिस निरीक्षक गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलिस उपनिरीक्षक मोतीराम बगाड, पो.ना. गहिनीनाथ यादव, पो.कॉ. सारंग वाघ, सागर धुमाळ, गोवर्धन जवरे, प्रकाश बोबडे, विजय जाधव, मयूर तोरडमल, गणेश डोंगरे, संतोष मगर, विवेक दळवी, पल्लवी गोरे, तसेच सुप्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे, पो.ना. पवार, खंडेराय शिंदे व योगेश सातपुते यांचा सहभाग होता.
Web Title: The police caught five robbers in disguise
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App