Home पुणे 5 कोटींचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं तरुणाची १८ लाखांची फसवणूक

5 कोटींचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं तरुणाची १८ लाखांची फसवणूक

Pune Crime: अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार करून पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हडपसर परिसरातील एका युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना.

18 lakh fraud of a young man with the lure of raining 5 crores

पुणे : अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार करून पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हडपसर परिसरातील एका युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

हा सगळा प्रकार महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असून या कायद्याच्या कलम 3 नुसार भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे.

अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी याबाबत म्हटलं की, युनिव्हर्सल शाळेशेजारी असलेल्या एका बंगल्यामध्ये भोंदूबाबा पूजा मांडून बसला होता. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून १८ लाख रुपये भरा, त्याचे तुम्हाला ५ कोटी रुपये करून देतो असे आमिष त्याने दिले होते. अधिक पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून चमत्कार जादूटोण्याच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने १८ लाख रुपये बाबाला दिले. त्यांनतर तोतया पोलिसांचे पथक तेथे आले आणि ते १८ लाख रुपये व भोंदूबाबाला घेऊन गेले.

मात्र, पोलिस हे तोतया असून भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांनी ही एकत्रित येऊन फसवणूक केल्याचे तरुणांच्या नंतर लक्षात आले. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा प्रकार घडला आहे. यासंबंधी तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

भोंदूबाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यात जादूटोणाविरोधी कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आलेली नाही.

Web Title: 18 lakh fraud of a young man with the lure of raining 5 crores

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here