Home अहमदनगर संगमनेर दूधगंगा पतसंस्थेमधील अपहार: दाम्प्त्याचा जामीन अर्ज फेटाळला

संगमनेर दूधगंगा पतसंस्थेमधील अपहार: दाम्प्त्याचा जामीन अर्ज फेटाळला

Sangamner News:  दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरण.

Dudhganga Institution embezzlement Couple's bail application rejected

संगमनेर: येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांच्या पाठोपाठ आता राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कृष्णराव कदम व त्यांच्या पत्नी प्रमिला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.

यामुळे आता कदम दाम्प्त्याला जामीनासाठी उच्च न्यायालयाचे दरव-  ाजा ठोठावा लागणार आहे. बहुचर्चित दूधगंगा पतसंस्थेचे ८१ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब कुटे व त्यांच्या परिवारातील मुले, सुना, पत्नी, या सर्वांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी फेटाळले.

आर्थिक घोटाळाप्रकरणी देवळाली प्रवरा येथील कृष्णराव श्रीपतराव कदम पत्नी प्रमिला कदम यांचा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन यावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी स. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी, खटल्यात आर्थिक गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने संबंधितांकडे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Web Title: Dudhganga Institution embezzlement Couple’s bail application rejected

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here