Home अहमदनगर अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोडणी कामगाराचा मृत्यू

अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत ऊसतोडणी कामगाराचा मृत्यू

Ahmednagar | Nevasa News: मोटारसायकल अपघातात ऊस तोडणी कामगार तरुणाचा मृत्यू.

Sugarcane worker dies in collision with unknown vehicle Accident

नेवासा: नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नेवासा शेवगाव रोडवरील मळीच्या नाल्याजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात ऊस तोडणी कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. ३ डिसेंबर रोजी घडली.

याबाबत मयताचा चुलतभाऊ चुनीलाल राघू राठोड (वय ४४) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्यांचा चुलतभाऊ भारत ओंकार राठोड (वय ३०) रा.तवलागड ता. कन्नड़ ऊस तोडणीचे काम करतो. दीड महिन्यापूर्वी तो त्याच्या पत्नीसोबत ऊस तोडणीचे कामासाठी गंगापूर (जि. संभाजीनगर) येथे गेला.

दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मला माझ्या नातेवाईकांचा फोन आला की, माझा चुलतभाऊ भारत ओमकार राठोड (वय ३०) हा त्याचेकडील मोटारसायकलवरुन (एमएच ०५ एएफ ९५७८) भेंडा गावचे शिवारातील नेवासा ते शेवगाव रोडने जात असताना अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक देऊन अपघात करून अपघात झाल्यानंतर जखमीस उपचारासाठी घेऊन न जाता निघून गेला. भारत ओमकार राठोड याचे मृत्यूस कारणीभूत ठरला.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकावर भारतीय दंड विधान कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), १३४(ब), १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोमवार दि.४ रोजी दुपारी शवविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Sugarcane worker dies in collision with unknown vehicle Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here