Home अहमदनगर Crime: न्यायालयाच्या आवारातच पोलिसाला मारहाण

Crime: न्यायालयाच्या आवारातच पोलिसाला मारहाण

Ahmednagar Crime: आरडाओरडा करणार्‍याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना.

अहमदनगर:  न्यायालयाच्या आवारात आरडाओरडा करणार्‍याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू मुरलीधर काळोखे (वय 42 रा. लालटाकी, सिध्दार्थनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार अनिल सुरजलाल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी दुपारी राजू काळोखे हा कोर्टाच्या समोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ, दमदाटी करत होता. तेथे नेमणुकीस असलेले अंमलदार चव्हाण व इतरांनी काळोखे याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने चव्हाण यांना मारहाण करून जखमी केले. तसेच लॉकअप गाडीच्या खिडकीच्या काचेला डोक्याने मारून मी आत्महत्या करतो व पोलिसांना कामाला लावतो, माझ्या पत्नीला तुमच्याविरूध्द केस दाखल करण्यास सांगतो, असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील  तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे करीत आहेत.

Web Title: the policeman was beaten inside the court premises Crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here