Home अहमदनगर अहमदनगर: तरुणीचा विनयभंग, एकीकडे अल्पवयीन मुलीला पळविले

अहमदनगर: तरुणीचा विनयभंग, एकीकडे अल्पवयीन मुलीला पळविले

Breaking News | Ahmednagar Crime: तुझे जमलेले लग्न मीच मोडले आहे. यानंतरही तू लग्न केल्यास तुझे लग्न मोडू, अशी धमकी देत मुलीचा हात धरून विनयभंग.

the young girl was molested, the minor girl was kidnapped

अहमदनगर : तुझे जमलेले लग्न मीच मोडले आहे. यानंतरही तू लग्न केल्यास तुझे लग्न मोडू, अशी धमकी देत मुलीचा हात धरून विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप गोपीनाथ कोतकर व प्रशांत गोपीनाथ कोतकर (रा. निंबळक, ता. नगर) या दोघांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तरुणीच्या वडिलांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीस पळवून नेले

श्रीरामपूर : शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील मजूरी करणाऱ्या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. ८ एप्रिल रोजी रात्री ८ वा. मुलगी बाथरूमला गेली होती, परंतु बराच वेळ ती न परतल्याने तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यामुळे कोणी तरी तिला फूस लावून, आमीष दाखवून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास शहर पोलिस करीत आहेत.

Web Title: the young girl was molested, the minor girl was kidnapped

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here