Home पुणे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

Breaking News | Junner: संस्कृतीला बिबट्याने अलगद उचलून बाजूच्या अर्धा किमी अंतरावरील उसाच्या शेतात फरफटत नेत ठार केले.

One and a half year old girl dies in Bibatya attack

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील संपत मोरे यांच्या शेतावर मुक्कामी असलेल्या धनगराच्या वाड्यावरील दीड वर्षाची चिमुरडी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. संस्कृती संजय कोळेकर असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. ११) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

रात्री जेवण झाल्यावर कुटुंब शेतात झोपले. पहाटे पाचच्या सुमारास आईच्या शेजारी झोपी गेलेल्या संस्कृतीला बिबट्याने अलगद उचलून बाजूच्या अर्धा किमी अंतरावरील उसाच्या शेतात फरफटत नेत ठार केले. गुरुवारी सकाळी उसाच्या शेतात संस्कृतीचा मृतदेह सापडला.

Web Title: One and a half year old girl dies in Bibatya attack

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here