Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग!  धावत्या कारचा बर्निंग थरार !

अहमदनगर ब्रेकिंग!  धावत्या कारचा बर्निंग थरार !

Breaking News | Ahmednagar: सध्या वाढलेल्या तापमानामुळे या कारने पेट घेतला असावा, असा अंदाज.

Ahmednagar The thrill of burning car

शेवगाव: शेवगाव शहरात कार बर्निगंचा थरार पाहावयास मिळाला श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयाच्या समोर ही घटना घडली. शहरात खंडोबा नगर परिसरात असणाऱ्या श्री. संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयासमोर काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजेदरम्यान एका चालत्या एलपीजी गॅस कारने अचानक पेट घेतला.

शहरात खंडोबानगर परिसरात कार पेटल्याचे लक्षात येताच त्यातील प्रवासी वाहन बंद करुन खाली उतरले. त्यांनी तेथून पळ काढला. कार पेटल्याने त्यातून अग्निज्वाला बाहेर पडत असल्याने त्यास विझविण्याची कोणी धाडस केले नाही. शेवटी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तेथे असणाऱ्या पाण्याच्या साह्याने ही आग विझविली. मात्र तो पर्यंत कार खाक झाली होती. सध्या वाढलेल्या तापमानामुळे या कारने पेट घेतला असावा, असा अंदाज वाहन नसल्याने छोट्या-मोठ्या आगीत आहे. दरम्यान, शहरात अग्निशामक नुकसान होत आहे.

Web Title: Ahmednagar The thrill of burning car

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here