Home क्राईम संगमनेर बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ, 1 लाख 40 हजारांचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने...

संगमनेर बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ, 1 लाख 40 हजारांचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास  

Sangamner Theft Crime:  चोरट्याने महिलेच्या पर्समधून दोन तोळे सोन्याची चेन, नथ, हातातील ब्रेसलेट, तर एकाच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची चेन असे एकूण 1 लाख 40 हजारांचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून चोर पसार.

Theft Crime spree at Sangamner bus station, three and a half tola gold ornaments worth 1 lakh 40 thousand 

संगमनेर: संगमनेर बस स्थानकात चोरीच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. अशातच आणखी घटना समोर आल्या आहेत. बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरटे महिला- पुरूषांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून पसार झाले आहे. चोरट्याने महिलेच्या पर्समधून दोन तोळे सोन्याची चेन, नथ, हातातील ब्रेसलेट, तर एकाच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची चेन असे एकूण 1 लाख 40 हजारांचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून चोर पसार होण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शांताबाई काशिनाथ सावंत यांनी आपल्या पर्समध्ये दोन तोळे सोन्याची चेन, नाकातील नथ, हातातील ब्रेसलेट हे सर्व सोन्याचे दागिने ठेवले होते. त्या संगमनेर बसस्थानक येथे आल्या असता त्याच दरम्यान चोरट्याने हा सोन्याचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. एकूण 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. त्यानंतर कारभारी शंकर उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले) हे संगमनेर बसस्थानकात आले होते.

बसमध्ये चढत असताना त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत उगले यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून पसार झाला. असे एकूण 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या साडेतीन तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. खाडे व पोलीस नाईक महाले करत आहे. संगमनेर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटे वारंवार महिला- पुरूषांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून पोबारा करत असतात मात्र या चोर्‍यांचा तपास लावण्यात शहर पोलिसांना यश आले नाही.

Web Title: Theft Crime spree at Sangamner bus station, three and a half tola gold ornaments worth 1 lakh 40 thousand 

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here