मेंढपाळांना रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करीत रोकड लांबविली
नगर तालुका | Theft: मोटारसायकलवरून घरी जात असलेल्या दोघा मेंढपाळणा रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करत ५० हजारांची रोकड व १२ हजार रुपयांचे केस कापण्याचे मशीन असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना नगर तालुक्यातील नांदगाव शिवारात घडली आहे.
याप्रकरणी कृष्णा भाऊसाहेब सरक रा, कोळपे आखाडा नांदगाव शिवार ता. नगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा सरक व आतेभाऊ गोरख कोळपे हे दोघे गुरुवारी रात्री ८:४५ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून कोळपे आखाडा येथे जात असताना नांदगाव शिवारात बिरोबा मंदिरासमोर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने गोरख कोळपे यास लोखंडी रॉडने हातावर व पायावर मारहाण करीत जखमी केले. इतर दोघांनी कृष्णा सरक यांच्या खिशातील ५० हजारांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. तसेच त्यांच्याजवळ असलेले केस कापण्याचे मशीन हिसकावून घेत तेथून पोबारा केला.
Web Title: Theft hit the road with an iron rod and took away the cash