Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, सोने, रोख रक्कम लंपास

संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, सोने, रोख रक्कम लंपास

Theft in Sangamner taluka ashvi khurd

संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे गुरुवारी पहाटे बंद घरातून सोने, रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच आश्वी खुर्द येथे पहाटे चार ते पाच ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र एका जागी सोडता इतर ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागले नाही.

 याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात हर्षद विलास बागुल हल्ली रा. आश्वी खुर्द, मूळ रा. कौठे-मलकापूर, ता. संगमनेर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मी आश्वी खुर्द येथे भाडेतत्त्वावर राहत आहे. मी माझ्या खाजगी कामासाठी लहान भाऊ विलास बागुल याच्याकडून त्याची तीन तोळ्याची चेन घेऊन आलो होतो. ती चेन मी घरातील कपाटामध्ये ठेवली होती. त्यामध्ये माझ्या मुलाचे दागिने व काही रक्कम होती. मी घराला कुलूप लावून  माझ्या मुळ गावी गेलो होतो.

दिनांक 24 जून रोजी सकाळी माझे घराशेजारी राहत असणारे अशोक शिंदे यांनी मला फोन करून घराला कुलूप लावले नसल्याची माहिती दिली. त्यानंतर माझ्या मित्रानी घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याची  माहिती दिल्यामुळे मी घरी येऊन पाहणी केली असता कपाटातून तीन तोळे वजनाची 1 लाख 5 हजार रुपये किमतीची चेन, 1 हजार 500 रुपये किमतीच्या बाळ्या, 8 हजार रुपये किमतीच्या दोन लहान अंगठ्या व 5 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 19 हजार 500 रुपयेचा ऐवज चोरीला गेल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे.

तसेच आश्वी खुर्द येथे डीपी बंद करून चोरट्यांनी चोरी केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Theft in Sangamner taluka ashvi khurd

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here