Home अहमदनगर अहमदनगर: फिर्यादीचा मेहुणाच निघाला घरफोडीचा सूत्रधार- Theft News

अहमदनगर: फिर्यादीचा मेहुणाच निघाला घरफोडीचा सूत्रधार- Theft News

Theft News brother-in-law of the plaintiff was the mastermind of the burglary

Ahmednagar | अहमदनगर: केडगाव परिसरात दिवसा घरफोडी करून तीन लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून (Theft) नेल्याची घटना घडली. यामध्ये फिर्यादीच्या मेहुण्याने आरोपींना घरफोडीबाबत माहिती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. मंगळवारी अविनाश दिलीप क्षेत्रे (रा. भूषणनगर, केडगाव) याला अटक केल्यानंतर तपासादरम्यान कोतवाली पोलिसांना ही माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी अमोल बाबासाहेब जरे (रा. केडगाव) याला गुन्ह्यात अटक केली आहे.

या प्रकरणी पुजा मनोज बडे यांनी फिर्याद दिली होती. कोतवाली पोलिसांनी तपास करून सुरूवातीला आरोपी क्षेत्रे याला अटक केली. त्याच्याकडून सहा तोळे सोने आणि 920 ग्रॅम वजनाची चांदी असा दोन लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस आरोपी क्षेत्रेकडे गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी करत असताना फिर्यादीचा मेहुणा असलेल्या अमोल जरे याने चोरट्यांना माहिती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.

यानंतर कोतवाली पोलिसांनी जरे याला ताब्यात घेत अटक केली आहे. फिर्यादी कुटुंबासह देव दर्शनासाठी जेजुरी या ठिकाणी गेल्या असताना आरोपी जरे देखील त्यांच्यासोबत होता. जेजुरीला पोहोचल्यावर जरेने आरोपी क्षेत्रे याला फोन करून आम्ही जेजुरीला पोहोचलो आहोत, असे सांगण्यात आले. त्यानंतर क्षेत्रेने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी करत तीन लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते.

Web Title: Theft News brother-in-law of the plaintiff was the mastermind of the burglary

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here