संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, पोलीस मात्र अपयशी
Sangamner Theft: संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी, कोठे कमळेश्वरमध्ये चोरट्यांची लुटमार झाल्याची घटना समोर आली आहे.
संगमनेर: संगमनेर शहर आणि तालुक्यात चोर, गुन्हेगारांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून घरफोड्या आणि चोऱ्यांचे सत्र दर दिवसाआड तालुकाभर सुरूच आहे. पोलिसांना चोरांना पकडण्यात मात्र अपयश येत आहे. चोऱ्यांच्या घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुकेवाडी शिवारात घरफोडी करून चोरट्यांनी ५५ हजार रुपये किमतीच्या नवीन कपड्यांची चोरी केली आहे. तर संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कवठे कमळेश्वर या गावात ७० हजार रुपये किमतीचे दागिने आणि मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहेत. या दोन्ही घटनांबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्हीकडेही आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेरातील दरोड्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा घरफोडी व चोरी झालेली आहे. या संदर्भात सविता विशाल गोसावी यांनी फिर्याद दिली असून सुकेवाडी येथे घरफोडी करून जीन्सच्या पॅन्ट, टी-शर्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, वेगवेगळे प्रकारचे लहान मुलांचे ड्रेस, वेगवेगळ्या पैठणी अशा वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
तर संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर या ठिकाण बाळासाहेब नाना भडांगे यांच्या घरातून अॅपल कंपनीचा मोबाईल, एक सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचे कर्णफुले असे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्याने घातलेला धुमाकूळ सुरूच असून चोरट्यांना पकडण्यात आणि त्यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अपयश येत आहे. वाढत्या चोऱ्या थांबत नाही आणि चोर चोरी करून खुलेआम फिरत आहे. नागरिक भितीदायक वातावरणात रहात असताना पोलीस मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान सुकेवाडी येथील घरफोडीचा तपास पोलीस हवालदार टोपले हे करीत आहे.
Web Title: Theft rampage continues in Sangamner taluka
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App