Home महाराष्ट्र आसाराम बापूचं बलात्कार प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, सुनावली शिक्षा

आसाराम बापूचं बलात्कार प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, सुनावली शिक्षा

Asaram Bapu Rape Case:  आसारामबापू यांनी सन २००१ ते २००६ या कालावधीत आश्रमातील एका शिष्येवर अनेक वेळा बलात्कार,  आसाराम बापूचं उर्वरित आयुष्य जेलमध्येच जाणार.

Asaram Bapu's big verdict in the rape case, the sentence was pronounced

गांधीनगर: अनुयायी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी आसारामला ही शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायालयाने आसारामला या प्रकरणात दोषी ठरवले, तर आसारामच्या पत्नीसह सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, आसारामला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आसाराम सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत.

गांधीनगर येथील न्यायालयाने स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना २०१३ मध्ये दाखल झालेल्या महिला शिष्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं. या प्रकरणात सत्र न्यायालयाने आज, मंगळवारी (३१ जानेवारी) आसारामला शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश डी. के. सोनी यांनी या प्रकरणातील निर्णय सोमवारी राखून ठेवला होता. न्यायालयाने पुराव्याअभावी आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. चंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या ‘एफआयआर’नुसार आसारामबापू यांनी सन २००१ ते २००६ या कालावधीत आश्रमातील एका शिष्येवर अनेक वेळा बलात्कार (Rape) केला.

विशेष सरकारी वकील आर. सी. कोदेकर यांच्या माहितीनुसार, न्यायालयाने आसारामला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ २ (सी) (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक गुन्हे) आणि इतर तरतुदींनुसार दोषी ठरवले आहे. आणखी एका बलात्कार प्रकरणात आसारामबापू यांना शिक्षा सुनावण्यात आली असून, ते सध्या जोधपूर येथील तुरुंगामध्ये आहेत.

Web Title: Asaram Bapu’s big verdict in the rape case, the sentence was pronounced

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here