Home संगमनेर संगमनेर तालुक्यात बिबट्याचा महिलेवर हल्ला, महिला नगर रुग्णालयात

संगमनेर तालुक्यात बिबट्याचा महिलेवर हल्ला, महिला नगर रुग्णालयात

Sangamner Taluka Bibatya Attack: शेतात गवत कापत असताना महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना.

Bibatya attack a woman in Sangamner taluka, woman injured

संगमनेर: शेतात गवत कापत असताना महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना दरेवाडी येथे मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शकुंतला शंकर मैड (वय ५५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दरेवाडी शिवारातील लांडगदरा येथे शकुंतला शंकर मैड या वास्तवास आहे. चारा आणण्यासाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शकुंतला मैड घरापासून काही अंतरावरील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतावरील बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. यादरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शकुंतला मैड यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने हल्ल्यात शकुंतला यांच्या दोन्ही हाताला चावा घेत गंभीररीत्या जखमी केले. शकुंतला यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक धावत आले अन बिबट्याने धूम ठोकली. शकुंतला यांना जखमी अवस्थेत तातडीने साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Bibatya attack a woman in Sangamner taluka, woman injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here