Home अमरावती लज्जास्पद! अल्पवयीन मेहुणीचे लैंगिक शोषण, गर्भारपण लादले

लज्जास्पद! अल्पवयीन मेहुणीचे लैंगिक शोषण, गर्भारपण लादले

Amravati rape Case: अल्पवयीन मेव्हणीचे लैंगिक शोषण (Sexual abuse) केल्याची घटना उघडकीस, तिच्यावर गर्भारपण लादले.

Sexual abuse of minor sister-in-law, forced pregnancy

अमरावती: आपल्याकडे कधी कोण काय करेल याचा काही नियम नाही. आधी फक्त म्हणीतच कधी तरी चेष्टेने ‘साली आधी घरवाली’ म्हटले जात होते. मात्र याच म्हणीचा अर्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न चांदूरबाजार तालुक्यातील एका तरुणाने केला. त्याच्या पराक्रमाची त्या पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली असून दोन्ही कुटुंबांना मात्र मान खाली घालण्याची वेळ आली. या जावयाच्या पराक्रमामुळे सासरचे हैराण झाले. याने चक्क अल्पवयीन मेव्हणीवर बळजबरी करत तिच्यावर गर्भारपण लादले.

२२ जुलै ते २० ऑगस्ट २०२२ या काळात त्याने अल्पवयीन मेव्हणीचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी ३० जानेवारी रोजी दुपारी त्यांच्याच हद्दीत राहणाऱ्या ४० वर्षीय जावयाविरूध्द बलात्कार (Rape), पोस्को व अॅट्रासिटीअन्वये गुन्हा (crime) दाखल केला.

दिलेल्या फिर्यादीनुसार, १० वर्षीय फिर्यादी मुलगी ही आरोपीची सख्खी मेव्हणी आहे. फिर्यादीची मोठी बहीण अर्थात आरोपीची पत्नी गर्भवती असल्याने घरकाम करण्याकरिता लहान बहिण यांच्या घरी आली होती. २२ जुलै २०२२ रोजी आरोपीने अल्पवयीन मेव्हणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. घटनेची वाच्यता केल्यास बहिणीला घरातून हाकलून देईल, तुला व तुझ्या बहिणीला मारुन टाकेने, अशा प्रकारची धमकी दिली. भीतीपोटी पिडितीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. यातील आरोपीचे गाव व घटनास्थळ हे चांदूरबाजार तालुक्यात व ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हट्टीत येते.

असे फुटले बिंग २० जानेवारी रोजी पोट दुखत असल्याने पिडिता ही आईसोबत खाजगी दवाखान्यात गेली. त्यावेळी तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. याप्रकरणी दुसऱ्याच दिवशी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपी जावयाविरूध्द त्यावेळी गुन्हा दाखल केला. तो ३० जानेवारी रोजी घटनास्थळ ज्या पोलिसांच्या हद्दीत येते, त्या ब्राम्हणवाडा थडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Sexual abuse of minor sister-in-law, forced pregnancy

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here