Home महाराष्ट्र पडक्या इमारतीमध्ये बारबालेवर बलात्कार, एकास अटक

पडक्या इमारतीमध्ये बारबालेवर बलात्कार, एकास अटक

Crime News:  बारमध्ये काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape).

Barba Laver Raped in Abandoned Building, One Arrested

पनवेल: बारमध्ये काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील अविनाश चव्हाण या आरोपीला पोलिसांनी पनवेल परिसरातून अटक केली आहे.

पीडित तरुणी मूळची उत्तर प्रदेशमधील असून, ती खोपोली येथील एका बारमध्ये काम करते. २९ जानेवारीला तिने मित्रासोबत पनवेलच्या हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर ती रात्री पनवेलजवळील घरी जायला निघाली. यावेळी आरोपी अविनाश व वाकड्या (पूर्ण नाव समजलेले नाही) यांनी तिला रिक्षाने घरी सोडतो, असे सांगितले. त्यानंतर ओरियन मॉलच्या पाठीमागे घेऊन जात तिला शिवीगाळ व दमदाटी केली. पहाटे दोन ते साडेचारच्यासुमारास रेल्वे रुळाच्या पलीकडील नवीन पनवेल येथील जुन्या पडक्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

कोणाला काहीही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच वाकड्या याने नाकावर ठोसा मारून तिला जखमी केले. त्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. पीडित तरुणीने यांची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अविनाश चव्हाण याला पनवेल परिसरातून अटक केली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

नवीन पनवेल पंचशीलनगर जवळील जुन्या पडीक इमारतीवर सिडकोच्यावतीने काही वर्षांपूर्वी अर्धवट तोडकामाची कारवाई झाली होती. हे अर्धवट तोडकाम करण्याचे कारण अजून समजलेले नाही. ही इमारत सहा ते सात मजली असून, येथे रात्रीच्या वेळेस अनैतिक धंदे सुरू असतात, अशी माहिती आजूबाजूच्या रहिवाशांनी दिली आहे. येथील अप्रिय घटना बंद करण्यासाठी ही इमारत संपूर्ण जमीनदोस्त करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Barba Laver Raped in Abandoned Building, One Arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here