Home संगमनेर संगमनेर: अमृतनगर सहकारी पतसंस्थेत चोरट्यांचा डल्ला  

संगमनेर: अमृतनगर सहकारी पतसंस्थेत चोरट्यांचा डल्ला  

Thieves in Amrutnagar Co-operative Credit Society

संगमनेर: संगमनेर शहरालगत असणाऱ्या थोरात सहकारी कारखानावरील अमृतनगर सहकारी पतसंस्थेत २९ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाली आहे.

अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचा दरवाजा तोडून ७६ हजार ५५९ रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर थोरात साखर कारखान्यासमोर अमृतवाहिनी सहकारी पतसंस्था आहे. गुरुवारी २९ ऑक्टोबरला पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचा दरवाजा, कडी कोयंडा तीक्ष्ण हत्याराने तोडून आत प्रवेश करून सुमारे ७६ हजार ४५९ रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय वसंत क्षीरसागर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक परदेशी हे करीत आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Thieves in Amrutnagar Co-operative Credit Society

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here