Home महाराष्ट्र कोरोनाची तिसरी लाट कधी येणार विचारले असता राजेश टोपे म्हणाले

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार विचारले असता राजेश टोपे म्हणाले

third wave of Corona would come Rajesh Tope said

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तिसऱ्या लाटेची संभाव्य चर्चा सुरु आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत. त्यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. धोका नसेल तर निर्बंध उठवावेत अशी मागणी जनतेकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाचे विधान केले आहे.

एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्याबाबत राजेश टोपे यांना प्रश्न विचारण्यात आला. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार की येणारच नाही याच उत्तर आपल्यावर अवलंबून आहे. असे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रशासानाने कोविडबाबत घालून दिलेले नियम व निर्बंध जनतेने पाळले. आवश्यक ती खबरदारी घेतली तर तिसरी लाट थोपवता येऊ शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: third wave of Corona would come Rajesh Tope said

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here