Home अहमदनगर लस मिळेना, अहमदनगरच्या नागरिकांनी केलं आंदोलन

लस मिळेना, अहमदनगरच्या नागरिकांनी केलं आंदोलन

vaccination halted in Ahmednagar

अहमदनगर | Vaccination: महाराष्ट्रात लसीकरणबाबत विक्रम रचल्याचे दावे केले जात आहे. आरोग्य विभाग सांगते की राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त लसीकरण झाले आहे, मात्र अहमदनगर शहरात लसीकरण अत्यंत संथ गतीने सुरु आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ ७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

या आठवड्यात तीन दिवस लस उपलब्ध झाली नाही. लसीकरण बंद राहिले. नागरिक वैतागले आहेत. खासगी रुग्णालयात पैसेही भरले आहे. मात्र त्यांना लस देण्यात आलेली नाही. यालाच वैतागून नागरिक जागरूक मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लसीकरण जर चालू ठेऊ शकत नसेल तर लॉकडाऊन ही चालू ठेऊ नका असे फलक लावत आंदोलन करण्यात आले.

Web Title: vaccination halted in Ahmednagar manch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here