Home क्राईम संगमनेर: दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, पोलिसांवर हल्ला, एक पसार

संगमनेर: दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, पोलिसांवर हल्ला, एक पसार

Sangamner Robbery gang arrested

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील माळवाडी बोटा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चार जणांना घारगाव पोलिसांनी जेरबंद केले आहेत तर एक जण फरार झाला आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक सत्तूर, एक चाकू, पकड, स्क्रू डायवर, दगडे व मिरची पूड असा ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय विखे, पोलीस नाईक गणेश लोंढे हे बुधवारी पहाटे गस्त घालत असताना माळवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाच जणाची टोळी संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी त्यांस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवर सत्तुराने हल्ला केला व दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने त्यातील चार जणांना ताब्यात घेतले तर अजून एक जण पसार झाला आहे.

जनाकू लिंबाजी दुधवडे वय २२ रा. गाढवलोळी अकलापूर, संजय निवृत्ती दुधवडे रा. गाढवलोळी अकलापूर दत्तू बुधा केदार वय १९ रा, नांदूर खंदरमाळवाडी, राजू सुरेश खडांगळे वय २५ रा. माळवाडी अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. भाऊ लिंबा दुधवडे वय २५ रा. गाढवलोळी अकलापूर हा फरार झाला आहे. हे सर्व जण पठार भागातील आहेत.

पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज राउत हे करीत आहे.

Web Title: Sangamner Robbery gang arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here