Home क्राईम संगमनेर तालुक्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

संगमनेर तालुक्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

Crime News arrested for torturing woman in Sangamner taluka

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील निमोण येथील २९ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या व मारहाण करीत सोन्याची लांबविण्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यातील संगमनेर तालुका पोलिसांनी सिन्नर येथील श्रीरंग पांडुरंग कटके यास अटक केली आहे.

निमोण येथील २९ वर्षीय महिला ही तिच्या बहिणीला भेटण्यासाठी घोटी येथे गेली असताना ती परतत असताना काळी पिवळी छोटा हत्ती गाडीतून येत असताना गाडीचालक श्रीरंग पांडुरंग कटके रा. सिन्नर याने काही अडचण असेल तर सांगत जा असे म्हणत गोड बोलून महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिच्याशी वारंवार बोलू लागला. त्याने तिच्या जीवनातील काही गोष्टी माहित करून घेतल्या.

त्यानंतर आरोपी श्रीरंग कटके याने तुझ्या मोबाइलमधील सर्व डाटा माझ्या मोबाइलमध्ये घेतला आहे. तू जर माझ्याशी शरीर सबंध ठेवले नाही, तर तुझे फोटो तुझी बहीण व मेव्हणे यांना दाखवीन व व्हायरल करीन अशी धमकी देत इच्छेविरुद्ध पिडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला तसेच अनैसर्गिक कृत्य केले. त्याशिवाय लोखंडी गजाने मारहाण करून पाण्याच्या जारची व स्कुटीची तोडफोड केली. पिडीत महिलेच्या गळ्यातील अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून घेतली.

याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी श्रीरंग पांडुरंग कटके उर्फ अंकुश पाटील (रा. सिन्नर) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचारसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी आरोपीस मंगळवारी सिन्नर येथून ताब्यात घेत अटक केली.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप अधिक तपास करीत आहे.

Web TItle: Crime News arrested for torturing woman in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here