Home संगमनेर पुण्यात तीन कोटीच्या जुन्या नोटा जप्त , संगमनेर नगरसेवकांसह पाच जणांना अटक

पुण्यात तीन कोटीच्या जुन्या नोटा जप्त , संगमनेर नगरसेवकांसह पाच जणांना अटक

पुण्यात तीन कोटीच्या जुन्या नोटा जप्त संगमनेर नगरसेवकांसह पाच जणांना अटक

संगमनेर: चलनातून बाद झालेल्या १००० व ५०० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या पांच जणांना खडकी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे २:३० च्या सुमारास रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी तीन कोटीच्या जुन्या नोटा जप्त केल्या या कारवाईत संगमनेरच्या नगरसेवकांसह पाच जणांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले कि, वैभव पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी काही जन येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोहोम्कर, माली , बारावकर,केकान नदाफ क्षीरसागर यांनी रविवार पेठेतील बंदिवान मारुती मारुती मंदिराजवळ सापळा रचला.

पहाटे २:४० च्या सुमारास काही जन आलेत त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्यातील पहिल्याकडे ५०० रुपयांचे १०० बंडल २० हजार नोटा, आरोपी दोन व चार यांच्याकडे १००० रुपयांची १९ बंडले १९०० नोटा, ५०० रुपयांचे १६ हजार नोटा, आरोपी तीन व पांच यांच्याकडे १ हजार रुपयांचे १०० बंडले १०००० नोटा मिळून आल्या. या आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी या नोटा बदलून देण्यासाठी एक जन येणार होता त्याची आम्ही वाट पाहत होतो. अशी माहिती दिली. या प्रकरणी खडकी पोलिस अधिक तपास करीत आहे. संगमनेर चे नगरसेवक गजेंद्र अभंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. जुन्या नोटा बंद होऊन आजही या नोटा सापडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here