Home महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज! दोन भावंडासह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

ब्रेकिंग न्यूज! दोन भावंडासह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Breaking News: शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना. (drowned)

hree, including two siblings, drowned in the farm

पंढरपूर: तालुक्यातील करकंब येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये दोन सक्ख्या भावांचा मृत्यू आहे.

करकंब शहरालगत असलेल्या मोडनिंब रोडवरील परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब व परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती.

या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून मनोज अंकुश पवार (११), गणेश नितीन मुरकुटे (७), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (९) या शाळकरी मुलांना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या चिमुकल्यांच्या जाण्याने लहान मुलांच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब व परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून नोंदीचे काम सुरु होते.

Web Title: Three, including two siblings, drowned in the farm

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here